शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोणालाही सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:49 IST

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. तसेच ...

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबाला दोन दिवसात शासकीय मदत दिली जाईल. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मग तो लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जातील, पोलिस यंत्रणेतील दोष सुधारले पाहिजेत, असेही ते म्हणाले.अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनिकेतच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या कुटुंबास मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते स्वत: दोन दिवसात मदतीची घोषणा करतील. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या सात पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. सांगलीत घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी राज्यस्तरावरील पोलिस अधिकाºयांशी चर्चा करुन उपाययोजना केल्या जातील. आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला की, हा तपास सीआयडीकडेच जातो. सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.केसरकर म्हणाले, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यानिमित्ताने सांगली पोलिस दलाच्या यंत्रणेत दोष असल्याचे दिसून येते. हे दोष सुधारले पाहिजेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करुन पोलिस प्रशासनातील त्रुटी दूर केल्या जातील. अटक केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासनातर्फे न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल. सांगलीकरांनीही तपासात सहकार्य करावे. शहरात शांतता नांदावी, यासाठी सहकार्य करावे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. या प्रकरणानंतर सांगलीकरांनी दाखविलेल्या शांततेबद्दल मी आभार मानतो. सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी पुकारलेला सांगली बंद मागे घ्यावा, अशी माझी विनंती आहे.केसरकर पुढे म्हणाले, पुढील काही दिवसात हा तपास वेगाने झालेला दिसेल. मुंबईत वरिष्ठ पोलिस अधिकाºयांमार्फत तपासाचा आढावा घेतला जाईल. झाकीर पट्टेवाले या झिरो पोलिसालाही अटक केल्याचे समजले. पोलिस दलात झिरो पोलिस लागतातच कशासाठी? यापुढे झिरो पोलिस दिसल्यास खपवून घेतले जाणार नाही.अनिकेत परत येणार नाही!केसरकर म्हणाले, अनिकेतचे कुटुंब दु:खात आहे. आर्थिक मदत देऊन या कुटुंबाचे दु:ख दूर होणार नाही. आज या कुटुंबाने कर्ता माणूस गमावला आहे. तो परत येणार नाही. यातील आरोपींना शिक्षा झाली तरच या कुटुंबाला समाधान वाटेल. यासाठी शासनाचे प्रयत्न असतील.कारवाई झालेली दिसेलकेसरकर म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणात ज्या काही तक्रारी व संशय व्यक्त करण्यात आला आहे, त्याची चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळलेला लहान असो अथवा मोठा, कारवाईतून कोणीही सुटणार नाही. निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेला कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल....तर नीतेश राणेंची चौकशीखून करुन गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी केला आहे. या प्रश्नावर केसरकर म्हणाले, नीतेश राणे हे वयाने आणि अनुभवाने लहान आहेत. त्यांची बौद्धिक पातळी काय, हे बघावे लागेल. अनिकेत प्रकरणात वक्तव्य करणाºया राणे यांच्याकडे जर काही माहिती असेल, तर त्यांचीही चौकशी करावी लागेल.

टॅग्स :Crimeगुन्हा